मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग वाहतूक ठप्प | CTA TRANSPORT सूचना

लोणावळा | महत्वाची वाहतूक सूचना

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर काल मंगळवारी (ता. ३) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळील आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली.

या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. परिणामी, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि हजारो प्रवासी १२ तासांहून अधिक काळ महामार्गावर अडकून पडले.

⚠️ काही काळासाठी दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

🚗 अनेक वाहनचालक व प्रवासी अन्न, पाणी व शौचालयाच्या सुविधांशिवाय रस्त्यावर अडकले.🚓 महामार्ग वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

🕛 मध्यरात्रीनंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत एकाच लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

तरीही, अद्याप संथ गतीने वाहतूक सुरू असून गर्दी कायम आहे.

🔁 पर्यायी मार्ग (सर्व वाहक व चालकांसाठी सूचना)

👉 पिरंगुट – ताम्हिणी घाट मार्गे

👉 मंचर – कर्जत मार्गेवरील पर्यायी मार्गांचा वापर करून पुढील प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

📢 CTA INDIA LOAD कडून विनंतीसर्व वाहक, ट्रक चालक व प्रवाशांनी प्रवासापूर्वी मार्गस्थिती तपासावी व सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.

📦 CTA TRANSPORT – तुमचा विश्वासू लॉजिस्टिक पार्टनर